सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचा दोन दिवस चालणारा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विज्ञान प्रदर्शन,बक्षिस वितरण व फन फेअर असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. विज्ञान प्रदर्शना नंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.बक्षिस वितरण समारंभाला संत राऊळ महाराज काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. स्मिता सुरवसे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थी व पालक यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव आनंद परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या बक्षिस वितरण कार्यक्रमात वर्षभरात विद्यार्यांनी शैक्षणिक तसेच खेळ व इतर क्षेत्रात शाळेत तसेच तालुका,जिल्हा व राज्यपातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला जातो.

यावेळी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अनिश मालवणकर, बेस्ट स्टुडंट कु.दिया देवजी तर बेस्ट प्लेअर अथर्व पारकर यांना गौरविण्यात आले.यशराज सुदेश आंगचेकर युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रिडा विभाग आयोजित तालुका स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विजयी व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड, कु. प्राजक्ता शिरोडकर युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रिडा विभाग आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड, स्वदीप उकिडवे युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रिडा विभाग आयोजित तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विजयी जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड, श्रेयांस सावंत ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत तालुक्यात प्रथम,कु.सिद्धी गावडे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीस पात्र यांचा गौरव करण्यात आला. त

सेच मार्च २०२४  मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत प्रथम आलेली कु.निधी पालकर, द्वितीय चिन्मय पेडणेकर तृतीय साक्षी प्रभूखानोलकर व मोहन मालवणकर यांचाही गौरव करण्यात आला. युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रिडा विभाग आयोजित तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत शाळेचा संघ विजेता ठरला व संघाची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजेत्या संघातील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित तालुका स्तरीय अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या कु. आराध्या मुणनकर,कु. सिया गावडे, सोनाक्षी तेंडोलकर,ओजस पाडगांवकर, कु.श्रेया मराठे,स्नेहल चुडजी यांनाही गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभानंतर पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी शुशू वर्गापासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित पालक व मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाची दाद मिळविली. दोन दिवस चालणारा हा शाळेचा कार्यक्रम वेंगुर्ला वासीयांसाठी एक पर्वणीच असते. येथे असणारे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थाचे स्टाॅल तर गर्दीने फुलून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!