कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले  

कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले  

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने 15 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पकडले.साथी अतुल माझी वय वर्षे 32, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता.डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश , लिझा रहीम शेख वय 28, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश अशी दोन्ही महिलांची नावे आहेत.

एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे ए एस आय उन्मेष पेडणेकर पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी ही कारवाई केली. दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट अथवा कागदपत्रांशीवाय कणकवलीत असल्याची माहिती ए टी एस पथकाला मिळाली होती.त्यानुसार ए टी एस चे पथक मध्यरात्री 3 वाजल्यापासून कणकवलीत दाखल झाले होते.

दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह ए टी एस च्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशनवर दबा धरला होता. पहाटे साडेपाच वाजता दोन बांगलादेशी महिलांना पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत ची फिर्याद ए टी एस पथकाचे पोलिस नाईक रोहन सावंत यांनी दिली आहे.विदेशी पारपत्र कलम 14 अ पारपत्र 1950 नियम 3 A 6 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी महिला कणकवलीत आल्या कशा ? कधीपासून कणकवलीत होत्या ? कणकवलीत कोणाकडे राहिल्या होत्या ? त्यांच्यासोबत अन्य कोणी महिला पुरुष साथीदार आहेत ? कणकवलीत येण्याचा उद्देश काय ? ह्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून याचा सखोल तपास कणकवली पोलीस करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!