*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सभा १७ जानेवारीला*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्गची विस्तारी जिल्हा कार्यकारणीची सभा शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शरद कृषी भवन, ओरोस येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी या सभेस सर्व प्रमुख नेते मंडळी, माजी आमदार, जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, महिला तालुकाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, युवासेना उप जिल्हाप्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व निमंत्रित सदस्य यांनी सदर बैठकीस नियोजित वेळेत अगत्य उपस्थित राहावे असे आवाहन मा.खा.श्री.विनायक राऊत साहेब व मा.श्री.अरुण दुधवडकर साहेब यांच्याकडून करण्यात आले आहे.