फोंडाघाट-गांगोवाडी येथील संकेत चव्हाण यांना डॉक्टरेट

फोंडाघाट-गांगोवाडी येथील संकेत चव्हाण यांना डॉक्टरेट

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट-गांगोवाडी येथील संकेत चव्हाण यांना डॉक्टरेट*

*पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव !*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

फोंडाघाट- गांगोवाडी येथील संकेत धोंडू चव्हाण यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये नुकतीच पीएचडी पूर्ण करून फोंडाघाट तसेच गांगोवाडीची शान वाढवली आहे. डॉ. संकेत चव्हाण यांनी गोविंद वल्लभ पंत कृषी व औद्योगिक विश्वविद्यालय, उत्तराखंड येथून पीएचडी नोंदणी पूर्ण करून “फळभाज्यांवरील किमती भारतातील मार्केट व परदेशी मार्केट या संदर्भात आयात व निर्यात” या महत्त्वपूर्ण विषयावरील भविष्यातील धोरण कसे असेल ? यावर संशोधन केले आहे.

डॉ. संकेत चव्हाण हे मूळचे घाट पायथ्याशी बसलेल्या फोंडाघाट गांगोवाडी, तालुका कणकवली येथील रहिवासी असून ते सध्या रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज,आर.आय. एस. नवी दिल्ली येथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा, गांगोवाडी आणि माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटमध्ये झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण एस. एम. कॉलेज कणकवली व पदवी शिक्षण कृषी महाविद्यालय, दापोली येथे झाले. पुढे पदव्युत्तर पदवीसाठी पंजाब अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, लुधियानामधून त्यांना स्कॉलरशिप मिळाली.घरची परिस्थिती बेताचीच त्यात पीएचडी दरम्यान दोन वेळा डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्या.तरीही हलाखीच्या आर्थिक व शारीरिक परिस्थितीवर, जिद्दीने मात करून त्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले.

त्यांच्या या यशात त्यांचे काका निळकंठ चव्हाण, त्यांचे आई- वडील, आजी व भाऊ त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पीएचडी संपादन केल्याबद्दल डॉ. संकेत चव्हाण यांचे नातेवाईक व मित्रांनी अभिनंदन केले. तसेच फोंडाघाट पंचक्रोशीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!