*कोंकण एक्सप्रेस*
*नाम.नितेश राणेंनी घेतले श्री रासाई देवीचे दर्शन*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांनी वैभववाडी तालुक्यातील आचीर्णे गावातील ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या वार्षिक उत्सवास उपस्थित राहून श्री रासाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने कॅबिनेट मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल नाम. राणे यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा बँकचे संचालक व आचिर्णे गावचे सुपुत्र श्री.दिलीप रावराणे,भाजप पदाधिकारी श्री.नासीरभाई काझी,श्री.सुधीर नकाशे,श्री बंड्या मांजरेकर,श्री.रितेश मेस्त्री,श्री.बंटी राणे,इतर पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.