*कोंकण एक्सप्रेस*
*चित्रकलेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रकार विजयराज बोधनकर कार्यशाळा घेणार !*
*कासार्डे :संजय भोसले*
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण साहित्य संमेलन राजापुरातील वाटूळ या गावी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.दिनकर गांगल असून या संमेलनात अनेक नामवंत लेखक, कवी, नाटककार यांची उपस्थिती असणार आहे. संमेलन परिसरात पुस्तक प्रदर्शन व विक्री असेल,इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन,चित्रकार दिगंबर मांडवकर यांचे चित्र प्रदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार,कवी,लेखक म्हणून ख्यातनाम असलेले विजयराज बोधनकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन असणार आहे तसेच ते चित्रकलेच्या विद्यार्थ्यांच्या साठी मोफत कार्यशाळा घेणार आहेत.
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व चित्रकला शिक्षकांना विनंती आहे की आपल्या शाळेतील साहित्याची आवड असलेल्या व चित्रकलेची आवड असलेल्या मुलांना संमेलनातील प्रदर्शनांना भेट देण्यास सांगावे तसेच चित्रकला कार्यशाळेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.दि. १ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ५ व दि.२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ही कार्यशाळा असेल. कार्यशाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत चित्रकला कागद किंवा वही,पेन्सिल,पेन,रंग, ब्रश इत्यादी साहित्य सोबत आणावे
संमेलनात उपस्थित राहणाऱ्या सर्व साहित्य रसिकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.दूरहून येणाऱ्या साहित्य रसिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांनी श्री.विशाल मोरे यांच्याकडे +91 95454 81846 या चलभाषवरून नोंदणी करावी.

