वरवडे ग्रामपंचायत सभागृहात पोलीस ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात आला.*

वरवडे ग्रामपंचायत सभागृहात पोलीस ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात आला.*

*कोंकण एक्सप्रेस*

*वरवडे ग्रामपंचायत सभागृहात पोलीस ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात आला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “पोलीस ग्राम संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने वरवडे येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये हा पोलीस ग्राम संवाद उपक्रम कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हडळ व श्री.किरण मेथे (गोपनीय विभाग) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हडळ यांनी सायबर गुन्ह्यांबाबत तसेच डायल 112 बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मोबाईल वरून सावधतेने आर्थिक व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल वरून येणारे अनोळखी कॉलबाबत व लिंक ओपन न करण्याबाबतच्या सूचना केल्या. किशोरवयीन मुलींनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या आईवडिलांशी प्रामाणिक राहावे. तसेच गावात येणारे फेरीवाले, भोंदू बाबा, धार्मिकतेच्या नावावर पैसे उकळणारे आल्यास किंवा त्यांच्याबाबत संशय आल्यास तात्काळ कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या व यापुढेही वरवडे येथील शाळा व उच्च विद्यालयांमध्ये असे पोलीस ग्राम संवाद कार्यक्रम राबविण्यात यावे अशा सूचनाही केल्या. यावेळी व्यासपीठावर कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल हडळ, वरवडे फळसेवाडी येथील वकील श्री. अभिजीत सावंत, वरवडे ग्रामपंचायत उपसरपंच श्री अमोल बोन्द्रे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास वरवडे पोलीस पाटील श्री. प्रदीप सावंत व फणसनगर पोलीस पाटील श्री.सिद्धेश मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रदीप घाडीगावकर, सदस्य श्री. प्रदीप कदम, श्री विशाल कासले, श्री सुधीर घाडीगावकर, श्री. विनायक घाडीगावकर, श्री अभिजीत शिंदे, वरवडे सरकारी रुग्णालय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत वरवडे ग्रामपंचायत उपसरपंच श्री. अमोल बोद्रे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल कासले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!