कोंकण एक्सप्रेस
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम
फोंडाघाट : प्रतिनिधी
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात सामूहिक वाचनाने करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून सामूहिक वाचन केले. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम महाविद्यालयात आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. नारे यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. 1 ते 15 जानेवारी या पंधरवड्यात महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. नारे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.