*मालवण देऊळवाड्यातील विकासकामांचा शुभारंभ*

*मालवण देऊळवाड्यातील विकासकामांचा शुभारंभ*

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण देऊळवाड्यातील विकासकामांचा शुभारंभ*

*निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पाठपुरावा*

*मालवण : प्रतिनिधी*

Read more 👇

मालवण शहरातील देऊळवाडा येथील विकास कामांचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामध्ये देऊळवाडा मेनरोड ते विजय गावकर घरापर्यंत जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे आणि नाईक वाडा रस्ता ते शरद गावकर घरापर्यंत जाणारा रस्ता कॉक्रिटीकरण करणे या कामांचा समावेश आहे. यातील पहिल्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

शिवसेना आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यासम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि माजी नगरसेवक जगदीश गावकर यांच्या प्रयत्नातून ही कामे मार्गी लागली आहेत. याप्रसंगी बाबू गावकर हरेश फणसेकर, संदेश वाळके, शरद गावकर, जितू वाळके, संतोष इन्ब्रामपूरकर, महेश गावकर, रवी मालवणकर, अक्षय माणगावकर, पार्थ गावकर अशोक गावकर चोखालिया, समीर मालवणकर, पांड्या फणसेकर यांच्यासह गावकर कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!