*पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग आणि हिरकणी वस्तीस्तरसंघ सावंतवाडीच्यावतीने संयुक्त योगोपचार शिबिर*

*पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग आणि हिरकणी वस्तीस्तरसंघ सावंतवाडीच्यावतीने संयुक्त योगोपचार शिबिर*

*कोंकण एक्सप्रेस*

*पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग आणि हिरकणी वस्तीस्तर संघ सावंतवाडीच्यावतीने संयुक्त योगोपचार शिबिर*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग आणि हिरकणी वस्तीस्तर संघ सावंतवाडी च्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त योगोपचार शिबिराचा रविवार दि 12 जानेवारी 2025 रोजी काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे सांगता समारंभ संपन्न झाला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी शहरात योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सावंतवाडी येथे संयुक्त योगोपचार शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग आणि हिरकणी वस्तीस्तर संघ यांच्या मार्फत विशेष योगाभ्यास घेण्यात आला . 6 दिवसांचे हे संपुर्ण योगशिबिर दि 7 डिसेंबर ते 12 जानेवारी 2025 या कालावधी पर्यंत यशस्वी पणे संपन्न झाले. अनेक योगसाधकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन योगाभ्यासाचा लाभ घेतला. आज या शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम योगवर्गात घेण्यात आला.
त्यावेळी सावंतवाडी नगर परिषद चे निरीक्षक अधिकारी श्री सागर साळुंके आणि पी आय श्री अमोल चव्हाण यांच्या हस्ते पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर यांना शाल , श्रीफळ आणि भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, डॉ. सोनल लेले, सौ. दिपाली सावंत, श्री. लक्ष्मण पावसकर, श्री. गजानन परब, श्री अनिल मेस्त्री, श्री रामनाथ सावंत, श्री चंद्रशेखर नाईक आणि सौ. चेतना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांनी सतत 6 दिवस शिबीर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले. सुत्र संचालन सौ अनिशा घाडी आणि आभार प्रदर्शन श्री विशाल लातये यांनी केले.
सदर चे शिबीर हे काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे घेण्यात आले, सावंतवाडी नगरपरिषद ने हॉल मोफत उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुमारे 35 योग साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली . शिबिर संपले तरी सावंतवाडी येथे दि 13 जानेवारी 2025 पासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे त्यात सर्वांनी सहभाग घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास शिकावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!