*कोंकण एक्सप्रेस*
*कोमसाप आणि नगर वाचनालयालयाच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी रोजी कणकवलीत काव्य संमेलन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखा व नगर वाचनालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ४ वा नगर वाचनालय सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कविच्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाचे अध्यक्षसस्थान सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध , प्रथितयश साहित्यिका , कवयित्री उषाताई परब या भूषविणार आहेत तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके हे संमेलनाचे उदघाटन करणार आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातअनेक मान्यवर , प्रतिभावंत कवी कवयित्री तसेच नवकवी सुंदर काव्य रचना करत आहेत . त्याना आपल्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतू आयोजनामागे आहे.या कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी व कवयित्रींनी आपली नावे व दोन स्वरचित कविता दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत कणकवली नगर वाचनालयालयाचे ग्रंथपाल श्री. राजन ठाकूर यांच्या पुढील व्हाट्सअप मोबाईल नंबर वर पाठवाव्यात. असे आवाहन करण्यात येत आहे.आपण पाठवत असलेल्या दोन्ही कविता कोणत्याही विषयावर स्वतः रचलेल्या असाव्यात त्यासाठी विषयाचे बंधन नाही तसेच सादर केले जाणारे काव्य हे दीर्घकाव्य असू नये. ज्या कविता व्हाट्सअप क्रमांकावर पाठवण्यात येतील त्यातील एकच कविता काव्य संमेलनात सादर करता येईल तरी जास्तीत जास्त कविनी या कवी संमेलनात सहभाग घ्यावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद , कणकवली शाखा आणि कणकवली नगर वाचनालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
काव्य संमेलनात सहभागी होण्यासाठी ग्रंथपाल राजन ठाकूर मोबाईल व्हाटस्अप नंबर
9421139688 आपल्या कविता पाठवाव्यात.ही विनंती.