*अ वर्ल्ड इन मोशन (अविम) या शैक्षणिक उपक्रमांतर्ग” जेट टॉय स्पर्धा” उत्साहात संपन्न*

*अ वर्ल्ड इन मोशन (अविम) या शैक्षणिक उपक्रमांतर्ग” जेट टॉय स्पर्धा” उत्साहात संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*अ वर्ल्ड इन मोशन (अविम) या शैक्षणिक उपक्रमांतर्ग” जेट टॉय स्पर्धा” उत्साहात संपन्न*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

एस.ए.ई. इंडिया आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा यांच्या संयुक्त विदयमानाने “अ वर्ल्ड इन मोशन (अविम) या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जेट टॉय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रगत विद्या मंदिर रामगड व द्वितीय क्रमांक विद्या मंदिर हायस्कूल कणकवली यांनी पटकावला आणि स्किमर टॉय या प्रकारात प्रथम क्रमांक माध्यमिक शाळा असरोंडी यांनी पटकावला तसेच द्वितीय क्रमांक विद्या मंदिर हायस्कूल कणकवली यांनी पटकावले. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे दिवसभर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी आपली संशोधनवृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडविले.या स्पर्धेतील विजेते प्रथम संघ पुणे येथे होणा-या राष्टूीय स्पर्धेसाठी थेट सहभागी होणार आहेत.

तत्पुर्वी या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे म्हणून कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष भूषण वाडेकर,ल. गो.सामंत शालेय समिती सदस्य सचिन घाडीगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे स्वयंसेवक समीर वंजारे, समीर माडये,संजय मालप,रुपेश मोरये,शाळा शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हयातील विदयार्थ्यांना इंजनियरीगची आवड निर्माण व्हावी व शैक्षणिक प्रगतीसाठी महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक सुबोध मोरये यांनी हा उपक्रम कोकणातील शाळांसाठी सामाजीक बांधीलकी (सी़एसआर) माध्यमातून उपलध्ब करुन दिला.

व्यावसायिक सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी (सीएसआर) महिंद्राने पाचवी व सहावीच्या विदयार्थ्यांसाठी “अविम” या उपक्रमाचे आयोजन केले होते.या अंतर्गत विदयार्थ्यांना सारख्याच प्रमाणात पुरविल्या गेलेल्या साहित्याच्या माध्यमातून स्कीमर व जेय टॉय करण्याची स्पर्धा झाली.तयार केलेल्या प्रकल्पांची त्यांच्या अधिकतम क्षमतांच्या मूल्यमापनाच्या आधारे निवड करण्यात आली.त्यात अधिकाधिक अंतर चालणे,वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे,वळण घेणे,जलद गतीने चालणे अशा चाचण्या व भविष्यातील इंजिनियरीगमधील आव्हाने, त्यावरील इनोव्हेटिव्ह आयडीया सादरीकरणाचा समावेश होता. अविममध्ये स्किमर व जेट टॉय यंदा जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक अशा 20 शाळांनी सहभाग घेतला होता. यांना शिक्षक आणि महिंद्राचे स्वयंसेवक यांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!