*कोकण Express*
*फोंडाघाट आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार 25 फेब्रुवारी रोजी फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी समाजातील वस्तीवर जावून वनविभाग कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेल्या कातकरी समाजबांधवांची भेट घेत वस्तूस्थितीची पाहणी केली. कातकरी समाजबांधवाना ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू जिल्हा महिला संघटक सौ.गीतांजली कामत यांच्या सौजन्याने भेट देण्यात आले. कातकरी समाजातील व्यक्तीवर झालेल्या मारहाणीचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. जर पीडित आदिवासी कातकरी समाजबांधवाना योग्य न्याय न मिळाल्यास राज्य मानवी हक्क आयोगाकडे य दाद मागण्यात येईल. आदिवासी पाड्यावर पाणी,वीज,रस्ता,पक्की घरे या मुलभुत सुविधा सुध्दा नाहीत. या मुलभुत सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे, त्यासाठीही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक,जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरसकर ,जिल्हा महिला संघटक सौ. गीतांजली कामत, कणकवली तालुकाध्यक्ष श्री. परेश परूळेकर, उपाध्यक्ष श्री. नारकर सहसचिव सौ.संजना सदडेकर, निरिक्षक श्री. निसार शेख,सदस्य श्री. राजू सावंत, सौ.परूळेकर उपस्थित होते.