कनेडी प्रशालेत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

कनेडी प्रशालेत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*कनेडी प्रशालेत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम*

*कणकवल ः प्रतिनिधी*

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वा मध्ये भरण, पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येते. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे.*

*त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये वाचन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. वार- शनिवार दिनांक- ११ जानेवारी २०२५ रोजी कनेडी प्रशालेच्या ग्रंथालया मध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक वाचन, परीक्षण, कथन, लेखन, ग्रंथालय भेट, प्रसिद्ध पुस्तकांचा परिचय, माझे प्रेरणादायी पुस्तक, नामवंत लेखकांचा परिचय असे विविध उपक्रम ग्रंथालय मार्फत राबवण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री आर. एन.भानुसे व ग्रंथालय प्रमुख श्रीमती माधवी प्रभू यांनी उत्कृष्ट प्रकारे ग्रंथालयाची सजावट व मांडणी केली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण यांनी विद्यार्थ्यांना वाचन संकल्प वृद्धींगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!