*कोंकण एक्सप्रेस*
*दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग मध्ये रेशीम उद्योग : एक व्यवसाय संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न …..*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीम उद्योग : एक व्यवसाय संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजकाल झपाट्याने घटक असलेले खाजगी आणि सरकारी नोकरीचे प्रमाण आणि त्यामुळे वाढत चाललेली बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या देशाला भेडसावत आहे. यावर मात करण्यासाठी तरुणांनी स्वतःचा असा पर्यावरणपूरक व्यवसाय सुरू करावा आणि निसर्ग पूरक व्यवसायाबद्दल मुलांना माहिती व्हावी हे उद्दिष्ट ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड, जि. कोल्हापूर चे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. निकम यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. निकम यांनी रेशीम उद्योगाची सखोल माहिती, कार्यपद्धती, रेशीम उद्योगासमोरील आव्हाने, इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमासाठी वनश्री प्रतिष्ठानचे श्री. संजय सावंत, प्राचार्य श्री. एम. व्हीं. गोळसे, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. एस.व्ही. मोरे, ए. एस. सिनारी , एस. बी. सुतार, के.के. तोरसकर, तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

