*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान स्पर्धेसाठी असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या इयत्ता पाचवीच्या संघाची निवड*
*कणकवली : प्रतिनिधी*
Society of Automotive Engineers India (SAEINDIA)
स्किमर प्रकारात माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी राष्ट्रीय स्तरावर
AWIM या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान स्पर्धेसाठी असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी च्या इयत्ता पाचवीच्या संघाची निवड झाली आहे.
कणकवली येथे शुक्रवारी झालेल्या विभागीय स्पर्धेत स्किमर प्रकारात
१) आदित्य सचिन परब,
२) दत्ता जकाप्पा इरकर,
३) तनुजा उमेश सावंत,
४) सायली समीर जंगले
यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्पर्धा पुणे येथे होणार आहे.
तसेच इयत्ता सहावीच्या जेट टॉय प्रकारात अक्षता अशोक खरात, साक्षी संतोष जंगले, मयुरी मिरेश खरात व शुभम दशरथ खराडे यांच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री.मिलिंद गांवकर सर यांचे संस्थाध्यक्ष श्री. विजय सावंत, सचिव श्री. प्रकाश सावंत सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.सुशांत पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.