लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य समुपदेशन संपन्न…

लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य समुपदेशन संपन्न…

*कोंकण एक्सप्रेस*

*लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य समुपदेशन संपन्न…*

*दोडामार्ग :शुभम गवस*

येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताणतणाव या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांना संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम, वेळेचे नियोजन, शारीरिक हालचाल, दृढ आत्मविश्वास,किशोरावस्थे मधील शारीरिक व मानसिक बदल याविषयी माहिती देण्यात आली. तसेच नैराश्य, चिंता, व्यसन, लठ्ठपणा यांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत, प्रा. दिलीप बर्वे, डॉ. राजेंद्र, रामदास रेडकर, समुपदेशक सचिन मोहिते, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ . संजय खडपकर, राजेंद्र इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!