*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेकुर्लीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक जत्रेत थाटले दुकान*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेकुर्लीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक जत्रेत थाटले दुकान*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेकुर्लीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक जत्रेत थाटले दुकान*

*सरपंच तेजस देसाईंनी भेट देत केले विद्यार्थ्यांचे कौतुक* 

*दोडामार्ग : शुभम गवस*

निमित्त होतं गावच्या वार्षिक जत्रौत्सवाचं.दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केर – भेकुर्लीच्या  विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक श्री.आकाश सानप व हरीश वळवी यांनी पालकांच्या मार्गर्शनाखाली शालेय उपक्रम म्हणून चक्क जत्रेत दुकान थाटले. चहा,भेल,खाजे इत्यादी विविध वस्तू विक्री करून शाळेसाठी छोटासा हातभार लावण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कौशल्य आणि विकसीत करणे यासाठी हा उपक्रम राबवल्याचे शिक्षकांनी सांगितले.गावचे सरपंच मा.श्री.तेजस देसाई तसेच त्यांचे सहकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेकुर्लीच्या स्टॉलला भेट दिली. तसेच स्टॉल मधून स्वतः खरेदी करून सहकाऱ्यांना सुद्धा खरेदी करण्यास सांगितले. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले व उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!