*कोकण Express*
*रवी जाधव ना इंदिरा गांधी संकुलात देण्यात येणार जागा*
*आ.दीपक केसरकर, तहसीलदार,मुख्याधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील व्यवसायिक रवी जाधव यांना व्यवसायासाठी इंदिरा गांधी संकुलातील दोन ओटे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती आज आमदार दिपक केसरकर यांनी दिली आहे.
तहसीलदार कार्यालयात आज आमदार दिपक केसरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उत्सव काळात त्यांना बाहेर बसून व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच येत्या आठवड्या भरात त्या ठिकाणी असलेल्या इतर व्यापाऱ्यांवर देखील पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
या सर्व प्रक्रियेवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष राहणार असल्याची माहिती त्यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.