कणकवली पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ

कणकवली पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ*

*शहरातून निघालेली शोभायात्रा ठरली लक्षवेधी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शोभयात्रेत भारतीय संस्कृती, परंपरा यांचा अनोखा मिलाप दर्शविणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. त्या चित्ररथांना अनुरूप गाण्यांचा ठेका, सजवलेल्या विविध देखावे अशा भारलेल्या वातावरणात भव्य शोभायात्रेने गुरुवारी सायंकाळी कणकवली पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटना पूर्वी शहरातून ढोल, ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नलावडे, आशिष वालावलकर, सिंधुगर्जना ढोल पथकाच्या साथीने श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मंडळे, शाळा या शोभायात्रेत सहभागी झाली होती. त्यांनी आकर्षक चित्ररथ तयार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!