सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक कार्यकर्ता शिबिर यावेळी दापोलीयेथे संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक कार्यकर्ता शिबिर यावेळी दापोलीयेथे संपन्न

*कोंकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक कार्यकर्ता शिबिर यावेळी दापोलीयेथे संपन्न.*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.*

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक कार्यकर्ता शिबिर यावेळी दापोली येथील मोकल बाग या ठिकाणी घेण्यात आले, यावेळी मंडळाचे 60 कार्यकर्तेबू या शिबिरामध्ये सहभागी झाले होते, सुरुवातीला मुरुड बीचवर पर्यटन केल्यानंतर, अभिषेक रिसॉर्ट येथे मंडळाचे अध्यक्ष श्री अजय संभाजी पाताडे, मा अध्यक्ष रामकृष्ण राणे,परशुराम उर्फ भाई प्रभू, एडवोकेट चंद्रकांत गायकवाड,संतोष धुरी, अरुण दळवी, सौ विद्या मेस्त्री, पराग पालकर, यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता शिबिर संपन्न झाले,16 एकर मध्ये मसाल्याची शेती करून, तसेच सरकारच्या भरोशावर न राहता स्वतः कल्पकतेने 12 फेरी बोट सुरू करून कोकणातील गावे जोडून दळणवळण यंत्रणा सुसज्ज करणारे एक आदर्श व्यक्ती महत्त्व प्रगतशील बागायतदार माजी आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल यांच्या बागेमध्ये प्रत्यक्ष भेट दिली, 85 वर्षाचा तरुण आजच्या तरुणाईला लाजवेल असा त्यांचा आत्मविश्वास होता, कोकणातील तरुणांनी आपली जागा न विकता आहे त्या जागेमध्ये अत्याधुनिक शेती करावी व त्यातून उत्पन्न मिळावावे ही त्यांची संकल्पना त्यानी प्रत्यक्षात आणली, अशा थोर माणसाची भेट घेतल्यानंतर सर्व कार्यकर्ते सुखावून गेले व काहीतरी मी माझ्या गावाला करण्याचं स्वप्न मनामध्ये वाळवून निघालो, अशाप्रकारे हे कार्यकर्ता शिबिर यशस्वी झाले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!