*कोंकण एक्सप्रेस*
*विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेना उबाठा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी गाववार दौरा*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेना उबाठा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी गाववार शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका पदाधिकारी यांचा दौरा तिन्ही जि. प. विभागात १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणार आहे.. असल्याची माहिती तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिली.
तालुक्यात बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचाराना मानणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्ते निराश झाले आहेत.त्यांना पुन्हा पक्ष कार्यात सक्रिय सहभागी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे,तसेच माजी खासदार तथा शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर,जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा दि. १० जानेवारी कोनाळ ११ जानेवारी मणेरी १२ जानेवारी माटणे विभाग निश्चित करण्यात आला. या दौरा केला युवासेना तालुका प्रमुख महिला तालुका प्रमुख उपजिल्हा संघटक उप तालुका प्रमुख, तालुका संघटक , उपजिल्हा संघटक, ,उप तालुका संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख,बुथ प्रमुख युवासेना व महिला आघाडी तसेच, जिल्हा बँक संचालक सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थातील कार्यकर्ते यांत सहभागी होणार आहे.असे तालुका प्रमुख गवस यांनी सांगितले आहे.

