*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रामीण भागातील शाळेला भेट देणे ही रोटरीची सेवा…*
*संजय केसरे; रांगणातुळसुलीतील शाळेला रोटरी तर्फे संगणक संच भेट…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील रांगणातुळसुली कदमवाडी शाळेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून संगणक संच प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळेला भेट देण्याचे भाग्य मिळणे हिच खरी रोटरीची सेवा आहे, असे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉ संजय केसरे यांनी व्यक्त केले.
यावेळी रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे माजी अध्यक्ष राजन बोभाटे, दिनेश आजगावकर, सचिन मदने, ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री कोळेकर, ज्येष्ठ नागरिक महादेव सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम सावंत, उपाध्यक्ष अरविंद सावंत, अंगणवाडीसेविका व मदतनिस, ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापक राजेश गुरव, सहशिक्षक प्रसाद मेस्त्री आदी उपस्थित होते.

