*कोंकण एक्सप्रेस*
*कडक ऊन्ह्याळ्यात वृक्षांना जीवदान देणारे पहिलीतील विद्यार्थी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर प्राथमिक विभागातील इयत्ता पहिलीच्या वर्गाला कार्यानुभव तासिके अंर्गत शाळेच्या परिसरातील वृक्षांना पाणी कसे घालावे यांचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांनी झाडांना पाणी अगदी आनंदाने घालण्याचे काम केले विद्यामंदिर शालेय परिसरात फळ झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यामध्ये जांभूळ ‘काजू , सिताफळ ‘ पेरू आंबा केळी जारूळ कदंब पांढरा कांचन ‘ अशोक ‘ फणस इत्यादी फळ झाडांची लागवड करून आदर्श निर्माण केला आहे यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी प्रोत्साहन देऊन प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा वृक्ष लागवडीसाठी उत्साह वाढवून सुंदर प्रकल्प निर्माण केला आहे बाल विद्यार्थांना वृक्षांचे महत्व आणि त्यांना वाढविण्यासाठी घेण्यात येणारे कष्ट समजावेत म्हणून पहिलीच्या विद्यार्थांना झाडांना पाणी घालण्याचे प्रशिक्षण देण्यात आले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ श्वेता करंबेळकर मॅडम व पहिलीच्या वर्ग शिक्षिका सौ खुडकर मॅडम यांनी बाल विद्यार्थांना प्रोत्साहन देऊन श्रमप्रतिष्ठ हे मूल्य प्रशालेत रुजविले .

