*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव हायस्कूलच्या एनसीसी विभागाला लेफ्टनंट कर्नल तनुज दीपक राव मंडीक यांची भेट*
*देवगड ः प्रतिनिधी*
शिरगाव हायस्कूलच्या एनसीसी विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एनसीसी प्रमुख लेफ्टनंट कर्नल तनुज दीपक राव मंडीक व त्यांचे सहकारी यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्या आगमनाने शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन केले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लेफ्टनंट कर्नल मंडीक यांनी एनसीसी कॅडेट्स आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी एनसीसी प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात एनसीसीच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एनसीसी प्रशिक्षण विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आणि राष्ट्रीय भावना विकसित करण्यास मोठी मदत करते.
यावेळी, शाळेतील एनसीसी विभागाच्या कामाची पाहणी करून त्यांनी एनसीसी अधिकारी श्री व्ही. बी. पावरा सर आणि श्रीमती एस. एन. धुरी मॅडम यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सने केलेल्या कामगिरीची प्रशंसा करताना त्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी लेफ्टनंट कर्नल मंडीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शाळेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री यू. जे. रावराणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि उपस्थित सर्वांनी एनसीसीच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

