खारेपाटण येथे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ

खारेपाटण येथे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ

*कोकण Express*

*खारेपाटण येथे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ*

​*खारेपाटण ः प्रतिनिधी*

​खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने ​१५ व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ  खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला.
यावेळी खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,संतोष पाटणकर,संकेत शेट्ये,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव,शंकर राऊत, अंजली कुबल,रीना ब्रम्हदंडे, ग्रामविकास अधिकारी जि एस वेंगुर्लेकर ,निलेश गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यापुढे सार्वजनिक ठिकाणी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाही करण्यात येणार असून अशी व्यक्ती आढळल्यास ​५००/- रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सूचना फलक खारेपाटण ​​ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहेत.
खारेपाटण मासळी मार्केट इमारतीच्या पाठीमागील भूखंडात घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एकूण ​४ मोठ्या चिरेबंदी पक्क्या  बांधकामाच्या टाक्या बांधण्यात आला असून यामध्ये कुजलेली भाजी व फळे,भाज्यांची पाने देठ,लिंबू व फळांचा चोथा,शिल्लक अन्न, अंड्यांची कवचे, चिकनचे टाकाऊ मांस भाग,कुजलेली फुले, निर्माल्य,नारळ सोडणे,शिल्लक नाशिवंत टाकाऊ मासे इत्यादी घाण कचरा पदार्थ व वस्तू या टाक्यांमध्ये टाकण्यात येणार असून ओला कचरा व सुका कचरा याकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने “एक पाऊल स्वछतेकडे” य उपक्रम अंतर्गत गावातील कचरा आता एकाच ठिकाणी संकलित करण्यात येणार आहे. ​१५ व्या वित्त आयोगातून सुमारे ​६०००० हजार रुपये खर्च करून हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यात आला असून गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व खारेपाटण शहरात सांडपाणी घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास याद्वारे सुरवात करण्यात आली  असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!