ग्रंथांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा सहवास : ग्रंथ प्रदर्शन व वाचन संस्कार उपक्रम संपन्न

ग्रंथांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा सहवास : ग्रंथ प्रदर्शन व वाचन संस्कार उपक्रम संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रंथांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा सहवास : ग्रंथ प्रदर्शन व वाचन संस्कार उपक्रम संपन्न*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला आणि नगर वाचनालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व वाचन संस्कार हा उपक्रम नुकताच पार पडला.विद्यार्थ्यांना उत्तोमोत्तम ग्रंथांच्या सहवासात घेऊन गेल्यावर निश्चिपणे सविद्यार्थी वाचनाकडे वळतात

त्याचाच एक भाग म्हणून कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने व नगर वाचनालय कणकवली या संस्थेच्या मार्गदशनाने बालकांच्या वाचन शक्तीला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयास केला गेला.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शन कसे पहावे,ग्रंथांची हाताळणी कशी करावी ग्रंथ वाचतांना काळजी कोणती घ्यावी,वाचनातून मनाची शक्ती कशी सुधारते,या विषयी मार्गदर्शन केले.वाचनातून महा वाचन चळवळ प्रशालेत उभी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी प्रशालेतील पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम श्री अच्युतराव वणवे सर श्री प्रसाद राणे सर सौ मुंडले मॅडम व ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!