*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यात “सेल्फी पॉइंट” उभारणार…*
*उदय सामंत; प्रत्येकी दहा लाखाची तरतूद…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शहरात “सेल्फी पॉइंट” उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून कुडाळ शहरात यापूर्वी असा सेल्फी पाॅईट उभारला आहे. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेल्फी पॉइंट उभारले जाणार आहे, असे श्री.सामंत यांनी सांगितले.