*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जिल्हा पोलीस दलाचा रेक्झिंग डे व पोलीस दलाची माहिती*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थांना पोलीस दलाची रचना पोलीसांचे कार्य पोलीसांचे संरक्षण विषयक धोरण पोलीस दलांची शस्त्रे साबर गुन्हे त्यासाठी श्वान पथके या विषयांचे मार्गदर्शन प्रशालेतील विद्यार्थांना करण्यात आले.कारण सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थाच्या वाढत्या तणावामुळे मनावर विपरित परिणाम होत आहेत.
यासाठी पोलीस अधिकारी यांनी किशोर वयातील गुन्हेगारी यांचे मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.प्रशालेतील इयत्ता आठवी व सातवी च्या विद्यार्थीसाठी ही माहिती देण्यात आली.या वेळी मुख्याध्यापक पिराजी कांबळे सरांनी पोलीस दलाचे आभार मानले.प्रशालेतील शिक्षक अच्युतराव वणवे सरांनी पोलीस दलांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले तर ग्रंथपाल महानंद पवार श्री बुधाजी दरवडा यांनी विद्यार्थीचे नेतृत्व केले.पर्यवेक्षक वृषाली जाधव मॅडम यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.