हातभार फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

हातभार फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*हातभार फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आ. उदयजी सामंत आणि लांजा-राजापूरचे नवनिर्वाचित आमदार आ. किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त हातभार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी आयोजित या शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेना कोकण विस्तारक हातभार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. पर्शुराम मारुती कदम, यांचे विशेष योगदान राहिले.

हे शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी यांच्या रक्तकेंद्राच्या सहकार्याने व शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी यांच्या माध्यमातून राबवण्यात आले. शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून रुग्णसेवेतील योगदान महत्त्वपूर्ण ठरवले.

मा. श्री. पर्शुराम मारुती कदम यांनी या शिबिराविषयी बोलताना सांगितले, “रक्तदान म्हणजे जीवनदान असून, हा उपक्रम रुग्णांना नवी आशा देतो. मंत्री व आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प करताना तरुणाईने दाखवलेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे.”याप्रसंगी उपस्थित सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिराचे यशस्वी आयोजन फाऊंडेशनचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, आणि शासकीय रक्तपेढीच्या कर्मचार्‍यांनी केले.

हातभार फाऊंडेशन यापुढेही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करून रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य सेवेचे काम करत राहणार आहे.ज्यांनी या कार्यासाठी आपले योगदान दिले त्यासर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे वडील रवींद्र सामंत, शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवासेना जिल्हाध्यक्ष मुन्ना देसाई, केतन शेटे, प्रमोद डांगे यांसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!