*कोंकण एक्सप्रेस*
*पाट हायस्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.मुलींच्या शिक्षणाकरिता केलेले कार्य, स्त्री सबलीकरण करिता केलेले कार्य.अगदी मुलांपर्यंत,समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने अशा विविध उपक्रमांचे आयोजन पाट हायस्कूलमध्ये करण्यात आले होते.कै एकनाथ ठाकूर कलाकादमी मध्ये कोकण कला व शिक्षण विकास संस्था सावंतवाडी यांच्यावतीने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते.
मुलांचा या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद लाभला.यावेळी सावंतवाडी येथील कोकण कला व शिक्षण विकास संस्था समन्वयक श्री समीर शिर्के, श्री भगवान राऊत,श्री प्रदीप पवार उपस्थित होते. त्यांनी या संस्थेविषयी माहिती दिली आणि संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये मुलांना सहभागी होण्याचे आवाहन केले आणि मार्गदर्शनही केले.
यावेळी मुंबई येथील आर्किटेक्चर श्री समीर राऊत आणि चंद्रशेखर तेली यांनीही भेट दिली.कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी विद्यालयामध्ये सुरू असलेल्या कलाविषयक विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी दीक्षा मराळ, द्वितीय क्रमांक कुमारी भक्ती तेली कोचरेकर, तृतीय क्रमांक कुमारी सलोनी खवणेकर,उत्तेजनार्थ कुमारी आर्या चांदेरकर तर उत्तेजनार्थ क्रमांक दोन कुमारी चैतन्य कोळमकर यांनी यश मिळवले.एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशीचे संस्था संचालक मुख्याध्यापक श्री राजन हंजनकर पर्यवेक्षक श्री सयाजी बोंदर यांनी अभिनंदन केले.