शासकीय विश्रामगृह ओरोस येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न : चालू वर्षातील पाच स्पर्धांचे नियोजन

शासकीय विश्रामगृह ओरोस येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न : चालू वर्षातील पाच स्पर्धांचे नियोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*शासकीय विश्रामगृह ओरोस येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न :चालू वर्षातील पाच स्पर्धांचे नियोजन*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग.

हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरस या ठिकाणी पार पडली या सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सभेत येत्या नजीच्या काळात होणाऱ्या 7 स्पर्धांचे यशस्वी नियोजन करण्यात आले व या सर्व स्पर्धा हौशी कबड्डी खेळाडू संघटनेच्या वतीने घेतल्या जातील. तर हौशी कबड्डी खेळाडू संघटने कडे नवीन येणाऱ्या संघाचे स्वागत करण्यात आले. कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान विविध नियमांचे काटेकोर पालन तसेच वेळेचे बंधन ठेवण्यात आले. स्पर्धा या वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपतील याची ग्वाही देण्यात आली तर यश परब यांच्याकडून गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण 17 स्पर्धांचा लेखाजोगा सादर करण्यात आला यावर्षी त्यापेक्षा अधिक स्पर्धा घेण्याचा मानस ठेवण्यात आला तर नजीकच्या काळात महिला स्पर्धा घेण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले. कोणीही कोणाचाही आमिषाला बळी न पडता हौशी कबड्डी खेळाडू संघटनेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे एकमताने ठरविण्यात आले. तर मुंबई उपनगर संघामधून निवड झालेल्या सुयोग राजापकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

त्याचप्रमाणे कुमारी वैष्णवी सावंत हिच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात तिच्या तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे एकमताने ठरवण्यात आले.तिला योग्य तो न्याय न मिळाल्यास खेळाडू संघटनेच्या वतीने उपोषण करणार असल्याचेही सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!