रोटरीच्या माध्यमातुन कुडाळ येथील मोफत महाशिबीर तपासणीस बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोटरीच्या माध्यमातुन कुडाळ येथील मोफत महाशिबीर तपासणीस बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*रोटरीच्या माध्यमातुन कुडाळ येथील मोफत महाशिबीर तपासणीस बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कुडाळ : प्रतिनिधी*

महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार योजना अंगिकृत मोफत महाशिबीर तपासणी आयोजन रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉ संजय केसरे यांचे सूयश हॉस्पिटल कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने सूयश हॉस्पिटल कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी एकूण 169 बांधकाम कामगारांनी शिबीराचा लाभ घेतला यापैकी 60 जणांना तात्काळ औषध वाटप करण्यात आले तर 40 जणांची विविध शस्त्रक्रीया या मोफत केल्या जाणार आहेत. 169 जणांची OPD तपासणी करण्यात आली.

या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष व सुयश हॉस्पिटल चे संचालक डॉ संजय केसरे, श्री गोगटे सर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ सचिव राजिव पवार, रोटरी सेवा प्रतिष्ठानचे राजन बोभाटे, अरूणा पॅथालॉजि चे संचालक रविंद्र परब, एच एल एल लाईफ केअर लिं. विभागीय व्यवस्थापक सुयोग दिक्षित, बांधकाम कामगार आरोग्य विभाग सिंधुदुर्ग चे जिल्हा व्यवस्थापक हर्षवर्धन कालेलकर, बांधकाम कामगार संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे, बांधकाम कामगार संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्राजक्त चव्हाण, बांधकाम कामगार तपासणी ते उपचार आरोग्य योजना एम एम यू कर्मचारी वृंद, डॉ जयश्री केसरे, आदी उपस्थित होते.

शल्यचिकित्सा विभाग अंतर्गत हर्निया, अपेंडीक्स दुर्बिन शस्त्रक्रीया, थायरॉईड, प्रोस्टेट कॅन्सर, मूतखडा, पित्ताशयातील खडे, मूत्राशयाचा कॅन्सर, हायड्रॉसिल, आदी शस्त्रक्रीया डॉ संजय केसरे यांच्या सूयश हॉस्पिटल कुडाळ येथे उपलब्ध आहेत. स्त्री रोग व प्रसूती विभाग अंतर्गत नॉर्मल डिलेव्हरी, सिजर डिलेव्हरी, कुटुंब नियोजन, गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रीया उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अस्थिरोग विभागांतर्गत हाडाचे फॅक्चर, गुडघ्याचे ऑपरेशन, खुब्याचे ऑपरेशन, सांधेदुखी, गुडघे दुखी, कंबरदुखी, कंबरेतील नस दबने, मानदुखी व मानेतील नस दबने, आदी शस्त्रक्रीया व उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. बालरोग विभागांतर्गत डेंग्यू, मलेरिया, अस्थमा, ब्रोकोलायटीस, काविळ अशा आजारांवर उपचार उपलब्ध असणार आहेत.

दुर्बिणीव्दारे गर्भ पिशवी ऑपरेशन, गर्भाशयातील गाठींचे ऑपरेशन, अपेंडिक्स, पित्ताशय पिशवी, हर्निया, हायड्रॉसिल, मूळव्याध, भगेंदर, मूतखडा, पोस्टेट ग्रंथी, नाकात हाड वाढणे, कानाच्या पडद्याचे ऑपरेशन, डोळ्यांचे तिरळेपणा, बिनटाक्याचे मोतिबिंदू ऑपरेशन, लासरू ऑपरेशन, सर्व प्रकारचे हाडाचे ऑपरेशन आदी शस्त्रक्रिया व उपचार डॉ संजय केसरे यांचे सूयश हॉस्पिटल कुडाळ येथे मोफत (शासनाच्या विविध आरोग्य योजनेंतर्गत) केले जाणार आहेत. महाशिबीर तपासणीचे प्रास्ताविक डॉ संजय केसरे यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ कुडाळ सचिव राजिव पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!