*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ येथील भाजप सदस्य नोंदणी अभियानास नाम.नितेश राणेंची भेट*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद साधला.यावेळी त्यांच्या सोबत भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी,बँक उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर व इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.