*कोंकण एक्स्प्रेस*
*भारतात आढळला ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रुग्ण; आठ महिन्यांच्या चिमुकलीला लागण !*
*मुंबई : प्रतिनिधी*
चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे.अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे. या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही,अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी,याची माहिती देण्यात आली आहे.तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. काय आहेत एचएमपीव्हीची लक्षणे?फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे.संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येतात,संसर्गाच्या प्रमाणानुसार आजाराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.