*कोकण Express*
*जिल्हा बँकेची निवडणूक घ्यायला सरकार का घाबरतय?*
*कोरोनाचे कारण सांगून ही निवडणूक सहाव्यांदा पुढे*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेची निवडणूक घ्यायला राज्य सरकार घाबरतंय, त्यामुळेच कोरोनाचे कारण सांगून ही निवडणूक सहाव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला.
येथील भाजप कार्यालयात श्री तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले जिल्हा बँकेचे केवळ १००९ एवढे मतदार आहेत त्यामुळे निवडणूक घेण्यास कोणतीच हरकत नव्हती. यापूर्वी जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्या वेळी सरकारला कोरोना दिसला नाही. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकी वेळीच कोरोना चे कारण सांगून ही निवडणूक पुढे ढकलली जात आहे. वस्तुतः आघाडी शासनातील तीन पक्षांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे देखील ही निवडणूक पुढे ढकलली जात असावी. दरम्यान राज्य शासनाच्या या निर्णया विरोधात ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्या ठिकाणच्या जिल्हा बँकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आम्ही आता या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.