*कोकण Express*
*कणकवली शहराचा मंगळवारी भरणारा आठवडा बाजार बंद*
*नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्ष नलावडे यांचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या मंगळवार पासून कणकवली शहराचा आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याची नोंद घेत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.राज्यासह जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी चा उपाय म्हणून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच कणकवलीत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आता 200 ऐवजी 500 रु दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, नियमित हात स्वच्छ ठेवावेत, सॅनिटराईज करावेत, मास्क वापरावा असेही आवाहन नलावडे यांनी केले आहे.