शब्द शंकरपाळी दिवाळी अंक २०२४ ला मराठबोली पुण्यातून तिसरा क्रमांक तर स्पंदन ट्रस्ट साताऱ्यातून उत्कृष्ट अंक पुरस्काराने सन्मानित

शब्द शंकरपाळी दिवाळी अंक २०२४ ला मराठबोली पुण्यातून तिसरा क्रमांक तर स्पंदन ट्रस्ट साताऱ्यातून उत्कृष्ट अंक पुरस्काराने सन्मानित

*कोंकण एक्सप्रेस*

*शब्द शंकरपाळी दिवाळी अंक २०२४ ला मराठबोली पुण्यातून तिसरा क्रमांक तर स्पंदन ट्रस्ट साताऱ्यातून उत्कृष्ट अंक पुरस्काराने सन्मानित*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

मराठी साहित्य क्षेत्रात दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि त्यांचे लोकार्पण केले जाते. “शब्द शंकरपाळी दिवाळी अंक” यास आतापर्यंत राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत पारितोषिके मिळालेली आहेत आणि साहित्य क्षेत्रात एकमेव ओळख निर्माण करून वेगळा ठसा उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. मराठबोली पुणे या संस्थेतर्फे शब्द शंकरपाळी दिवाळी अंकास तृतीय क्रमांकाचे पारितोषक तर साताऱ्यातून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे “उत्कृष्ट दिवाळी अंक” म्हणून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या दिवाळी अंकाचे संपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरवल येथील भूषण तांबे गेली 5 वर्षे यशस्वीपणे करत आहेत.

काही वर्षी हा दिवाळी अंक पुस्तक स्वरूपात करण्यात आला. तर, काही वर्षी हा दिवाळी अंक ऑनलाइन स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. प्रत्येक वर्षी अंक प्रकाशित करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही सर्व अडचणींवर मात करून शेवटी समूहाने यशस्वीरित्या दिवाळी अंक प्रकाशित केला. २०२४ या वर्षात महाराष्ट्र राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अनेक दिवाळी अंकांनी स्पर्धांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामध्ये मराठबोली पुणे या संस्थेतर्फे शब्द शंकरपाळी दिवाळी अंकास तृतीय क्रमांकाचे पारितोषक देऊन गौरविण्यात आले आणि विशेष कौतुक म्हणून खास गौरवउदगार करण्यात आले. या कार्यक्रमास भूषण तांबे, मृगनयना भजगवरे, शलाका कोठावदे, प्रदीप बडदे, शितल मदने, राजपूत काशीबाई, सारिका सरकाळे, मिरा खंडागळे, रसिका तुपे, शिवाजी जाधव, सारंग सबनीस, वृषाली कुलकर्णी, हेमलता निगडे इत्यादी साहित्यिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या पुरस्काराचे वितरण साहित्यिक हेमंत परब यांच्या शुभहस्ते झाले. तर शिवाजी भापकर, परमेश्वर उमरदंड, शरद अत्रे, साहेबराव पवळे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. तर सचिन कुरकुटे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अलीकडेच याच अंकास साताऱ्यातून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे “उत्कृष्ट दिवाळी अंक” म्हणून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दोन्ही ठिकाणी पारितोषिक म्हणून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शब्द शंकरपाळी दिवाळी अंकाच्या आजवरच्या साहित्यिक प्रवासात सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित होत आहे आणि त्याचे विशेष कौतुक करून त्यास सन्मान देण्यात येत आहे. मराठी साहित्य क्षेत्रात तसेच विविध स्तरांवर शब्द शंकरपाळी काव्यप्रकाराचे तसेच दिवाळी अंकाचे विशेष कौतुक करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!