*कोंकण एक्सप्रेस*
*नामदार नितेश राणे भाजपा सभासद नोंदणी अभियान निमित्ताने मालवण भाजपा कार्यालयात राहणार उपस्थित*
*मालवण : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यविकास व बंदर विकासमंत्री नितेशजी राणे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत रविवार 5 जानेवारी सायंकाळी 4 वा. मालवण दौऱ्यावर येत आहेत.
भाजपा सभासद नोंदणी अभियान निमित्ताने मंत्री नितेश राणे भाजपा कार्यालय मालवण येथे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बूथ अध्यक्ष सर्व शहर,तालुका,जिल्हा पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील नागरिकांना आवाहन करून मंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्याना भाजपा सभासदत्व स्वीकारण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष विष्णू मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.

