मळेवाड जिल्हा भजन स्पर्धेत नवतरुण,माणगाव प्रथम

मळेवाड जिल्हा भजन स्पर्धेत नवतरुण,माणगाव प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*मळेवाड जिल्हा भजन स्पर्धेत नवतरुण,माणगाव प्रथम*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

मळेवाड भटवाडी येथील ब्राह्मण देव-दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळ, आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत नवतरुण युवक भजन मंडळ,माणगावने प्रथम क्रमांक पटकावला.चिंतामणी भजन मंडळ,तळेकरवाडीने द्वितीय,तर महापुरुष भजन मंडळ,पिंगुळीने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचा उर्वरित निकाल असा उत्कृष्ट हार्मोनियम – हर्षल मेस्त्री (श्री सद्गुरू भजन मंडळ, अणसूर), गायक दुर्गेश मिठबावकर (सिद्धिविनायक भजन मंडळ, जानवली) तबलावादक विनोद देऊलकर (देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव), झांजवादक दिवेश पेडणेकर (सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा), पखवाजवादक विशाल कोंडुरकर (नवतरुण युवक भजन मंडळ, माणगाव), कोरस (लिंगेश्वर-पावणादेवी भजन मंडळ, कणकवली) यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैभव परब व अमेय गावडे यांनी काम पाहिले. तर सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारिताषिके वितरित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!