*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड आनंदवाडी जेटीवरील पान टपरी अज्ञातांनी फोडली*
*देवगड : प्रतिनीधी*
देवगड आनंदवाडी जेटी येथील संतोष जगताप यांची पानटपरी कडी कोयड्याने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आला देवगड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड आनंदवाडी जेटी नजीक असलेल्या संतोष अरुण जगताप ४८ (जगतापवाडी) यांची पानटपरी अज्ञात चोरट्याने कडी कोयंड्याने गुरुवारी रात्री नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अरुण संतोष जगताप यांनी देवगड पोलिसात तक्रार दिल्यानंतर, देवगड पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली.अज्ञात चोरट्याविरोधात देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास उदय शिरगावकर करत आहे.