*कोंकण एक्सप्रेस*
*सरपंच सेवा संघाचे ८ रोजी धरणे आंदोलन*
*कै.संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
बीड जिल्ह्यातील सरपंच कै.संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली,त्यातील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही.ही राज्यातील अत्यंत दुर्दैवी आणि काळीमा फासणारी घटना आहे. याचाच निषेध म्हणून ८ जानेवारी रोजी स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांसह जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.