विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किशोर अवस्थेतील व्यसनाधिनता व गुन्हेगारी या विषयी पालकांना मार्गदर्शन

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किशोर अवस्थेतील व्यसनाधिनता व गुन्हेगारी या विषयी पालकांना मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किशोर अवस्थेतील व्यसनाधिनता व गुन्हेगारी या विषयी पालकांना मार्गदर्शन*

*कणकवली :प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता नववी विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा आयोजित करून मूल घडवितांना किंवा वाढवितांना घेण्याची काळजी या विषयावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर यांनी पालकांना किशोर अवस्थेतील वाढती गुन्हेगारी व व्यसनाधिनता या विषयावर मार्गदर्शन करून बदलत्या काळात नविन पिढी या विषारी विळख्यातून बाहेर कशी पडेल आणि यावर उपाय योजना कशी करावी लागेल या विषयी पालकांना उद्बोधन करून नव्या युगातील करिअरच्या वाटा याची उत्तम प्रकारे माहिती पालकांना दिली.

प्रशालेचे जेष्ठ अध्यापक श्री अच्युतराव वणवे सरांनी इयत्ता नववीचा अभ्यासक्रम आणि प्रशालेतील विविध उपक्रम यांचा आढावा घेऊन पालकांनी मुलांच्या अभ्यासात मदत कशी करावी आणि आपल्या पाल्यांची आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. श्री सिंगनाथ सरांनी व्यक्तीमत्व विकासासाठी नवनविन कोर्स कोणते आहेत याचे मार्गदर्शन केले.श्री सुदिन पेडणेकर सरांनी मोबाईलचा अतिवापर आणि आजचा विद्यार्थी या विषयी मार्गदर्शन केले पालकांमधून दोन पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशालेतील विविध उपक्रमां बद्दल कौतुक केले शाळेच्या भौतिक गरजा पुरतेसाठी पालकांना मदतीचे आवाहन करण्यात आले.या पालक सभेला इयत्ता नववीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वर्गशिक्षक व विषय शिक्षक उपस्थित होते.आभार श्री विलासराव ठाकूर सरांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!