कणकवलीतील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

कणकवलीतील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीतील अपघातात मोटारसायकलस्वार ठार*

*माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयासमोरील घटना*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली शहरात झालेल्या मोटारसायकल अपघातात संजोग श्रीधर सावंत (वय ३४, रा. मधलीवाडी) हा तरूण ठार झाला. तसेच मोटारसायकल चालक महेश गंगाराम चौगुले (वय २८, रा. वागदे) हा देखील जखमी झाला आहे. गुरूवारी २ जानेवारीला रात्री साडे नऊ वाजता माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयासमोरील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर ही घटना घडली.

हिरोहोंडा कपंनीची मोटारसायकल घेऊन महेश गंगाराम चौगुले, संजोग श्रीधर सावंत आणि त्यांचा एक मित्र असे तिघे कणकवली शहरातून वागदे येथे जाण्यासाठी निघाले होते. नरडवे रोड ओलांडल्यानंतर महेश चौगुले याने मोटारसायकल भरधाव वेगाने चालवली. वैभव नाईक यांच्या कार्यालयासमोर असलेला स्पीडब्रेकर आणि महामार्गाची संरक्षक भिंत यांच्यामधील गॅप मधून काढत असताना मोटरसायकल संरक्षक भिंतीला आदळून तशीच घासत पुढे पंधरा फूट गेली. या अपघातात मोटरसायकल वरील तिघेही रस्त्यावर कोसळले. यामध्ये सर्वात मागे असलेल्या संजोग सावंत याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापती झाल्या. त्याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रूग्णालयात नेले जात असताना वाटतेच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!