*कोंकण एक्सप्रेस*
*वझरेत कायमस्वरूपी तलाठ्याची मागणी*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
वझरे सजामध्ये स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात यावा अशी वारंवार मागणी तहसीलदार दोडामार्ग यांच्याकडे केली.मात्र त्यांनी प्रत्येकवेळी प्रभारी तलाठी नेमून ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी तलठ्याची नेमणूक करावी अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा वझरे, गिरोडे, माटणे, आंबडगाव आदी गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.