विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत शिक्षक दिन साजरा

विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत शिक्षक दिन साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत शिक्षक दिन साजरा*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर हरकुळखुर्द या प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून दि. 03 जानेवारी रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

श्री पवार सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक लिपिक व शिपाई यांची भूमिका पार पाडून शाळेचे पूर्ण दिवसाचे कामकाज पाहिले.

मुख्याध्यापक म्हणून यज्ञेश विनोद रासम इयत्ता दहावी याने जबाबदारी सांभाळून सर्व विद्यार्थी शिक्षकांकडून अध्यापनाचे चांगले काम करून घेतले. तसेच नामदेव आत्माराम तेली इयत्ता नववी (इतिहास)स्वराली विलास भोसले इयत्ता दहावी( इंग्रजी)जान्हवी विलास कदम इयत्ता दहावी (मराठी )गौरी प्रशांत घांडीगावकर इयत्ता नववी( गणित) अदिती सुभाष रासम इयत्ता नववी( विज्ञान 1) कृतिका कमलाकर रासम नववी (हिंदी) ओम उमेश ताम्हाणेकर नववी (शारीरिक शिक्षण )अमोल उदय डिचवलकर नववी (भूगोल) मेहुल गजानन दळवी आठवी (गणित)व यज्ञेश विनोद रासम इयत्ता दहावी (विज्ञान 2) या विषयांचे अध्यापन केले शिपाई म्हणून तन्मय दिलीप शेळके दहावी, गौरव विलास हरकूळकर दहावी,आर्यन अजय मडव आठवी,जयदीप विनोद रासम आठवीव क्लार्क म्हणून प्रितेश सतीश रासम यांनी काम पाहिले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सभाधितपणा,जबाबदारी,शिस्त व वक्तशीरपणा या मूल्यांची रुजवणूक झाली. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री किशोर अनंत यादव यांनी केले कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!