*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती माता पालक मेळावा भरवून साजरी*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती आधुनिक विचारांचा मेळावा भरवून साजरी करण्यात आली.प्रशालेत माता पालक संघ,सखी सावित्री संघ,उत्कर्षा संघ असे कुमार वयातील मुलींच्या संरक्षणासाठी विविध संघ स्थापन करण्यात आले आहेत.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या माता पालक यांचा भव्य मेळावा भरविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जवळ जवळ पाचशे माता पालक हजर होते. प्रशालेच्यावतीने प्रमुख मार्गदर्शक म्हणून कणकवली शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ शमिता बिरमोळे मॅडम हजर होत्या.माता पालक मेळाव्याला मार्गदर्शन करतांना डॉ शमिता बिरमोळे मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले व जोतीराव फुले यांच्या विचारातून आधुनिक सुधारणेची बिजे कशी निर्माण होतात या विषयी मार्गदर्शन करून भारतीय पारंपरिक संस्कृती आणि स्रीयांचे आरोग्य तसेच आधुनिक जीवन शैली आणि नव्या युगातील आजार या विषयावर माता पालक यांना सुंदर उद्बोधन करून आपली मुले वाढविताना व घडवितांना मातांनी कोणती काळजी घ्यावी तसेच कुमार वयातील बद्दलची माहिती आणि मुलांचे आजार व मानसिकता याचे सुंदर मार्गदर्शन करून माता भागिनींचे मनोबल उंचावले तसेच आधुनिक सायबर गुन्हे व लैंगिक शोषण स्रीयांचे संरक्षण या विषयांचे मार्गदर्शन सौ रिया सांगेलेकर मॅडम यांनी माता पालकांना केले. सौ श्रद्धा कदम मॅडम यांनी सावित्रीबाई फुले व ग्राहक हक्क कायदा या विषयांचे मार्गदर्शन केले यावेळी .प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी बाल गुन्हेगारी आणि सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शन करून प्रशालेत माता पालक संघ स्थापन करण्याचा उद्देश तसेच सखी सवित्री संघ आणि त्यांचे कार्य उत्कर्षा मंडळ कुमार वयातील मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या त्यातून उद्भवणारे आजार या विषयांचे मार्गदर्शन सौ शर्मिला केळुसकर मॅडम यांनी केले.
जेष्ठय शिक्षक श्री अच्यूतराव वणवे सरांनी माता पालक संघातून विद्यार्थांचे आरोग्य व संरक्षण याचे मार्गदर्शन करून प्रशालेच्या विकासासाठी भौतिक साधनांची गरज या माध्यमातून माता पालकांना मदतीचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूचसंचालन सौ सावंत पी पी मॅडम यांनी केले तसेच प्रशाळेच्या पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार सौ वारघडे मॅडम यांनी मानले.