*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप सिंधुदुर्ग युवा मोर्चाची कार्यकारणी बैठक संपन्न*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा ची कार्यकारणी बैठक वसंत स्मृती भाजपा जिल्हा कार्यालय ओरोस येथे पार पडली.यावेळी सदस्य नोंदणी अभियान या विषयासंदर्भात जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षते खाली चर्चा करण्यात आली.नोंदणी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी उपस्थित युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे लखम राजे भोसले, युवा सोशल मीडिया जिल्हा संयोजक मंदार पडवळ, युवा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे मंडळ अध्यक्ष व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.