मराठा मंडळ व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालण्यास प्रारंभ

मराठा मंडळ व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालण्यास प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*मराठा मंडळ व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालण्यास प्रारंभ*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश*

*कणकवली :प्रतिनिधी*

कणकवली शहरातील मराठा मंडळ जवळील आणि कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

या मागणीची दखल घेऊन या केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकण्यास सुरवात करण्यात आली आहे.या प्लेट्स टाकल्यामुळे वाहून जाणारे पाणी भरपूर प्रमाणात अडवण्यात येणार आहे.याचा फायदा कणकवली शहरातील जलस्रोतांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!