*कोंकण एक्सप्रेस”
*प्राथमिक शाळांच्या वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ही स्पर्धा वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,केंद्रप्रमुख नितीन कदम, शिक्षक समितीचे अध्यक्ष सीताराम नाईक,संतोष परब,अधीक्षक महेश नाईक,तेजस बांदिवडेकर,शिक्षक भारतीचे सागर कानजी, शंकर जाधव,ज्ञानेश्वर हरमलकर आदी उपस्थित होते.